डेबिट कार्ड आणी क्रेडिट कार्ड चा वापर करुन पैसे कसे कमवायचे?

डेबिट/ क्रेडिट कार्डचा वापर हा ऑनलाईन किंवा दुकानामधून वस्तू जसे कपडे, मोबाईल, शूज, पुस्तके आणी बरेच ची खरेदी करण्यासाठी केला जातो. तसेच तुम्ही डेबिट/ क्रेडिट कार्ड रेस्टॉरंट, हॉटेल मधेही वापरू शकता. तुम्ही केलेल्या खरेदीचे किंवा हॉटेल मधील जेवणाचे क्रेडिट कार्ड चे बिल तुम्हांला ठराविक काळाच्या आत (जास्तीत जास्त 45 दिवस ) भरावे लागते आणी डेबिट कार्ड चा वापर केल्यास तुम्ही केलेल्या खरेदीचे पैसे किंवा जेवणाचे पैसे लगेचच तुमच्या बँक खात्यामधून कमी होतात.

डेबिट/ क्रेडिट कार्ड चा वापर करुन कोणतेही वस्तू स्वतःसाठी खरेदी न करताही तुम्ही पैसे कमवू शकता . शक्यतो जेव्हा विविध सण, उत्सव असतात तेव्हा इकॉमर्स वेबसाईटस (अमेझॉन, फ्लिपकार्ट) वर डेबिट कार्ड आणी क्रेडिट कार्ड चा वापर केल्यास खरेदीवर 10% किंवा त्याहूनही जास्त डिस्काउंट भेटतो. पण आपल्याकडे जरी डेबिट / क्रेडिटकार्ड असले आणी वस्तूंवर डिस्काउंट असला तरी आपण गरज नसल्यास वस्तूंची खरेदी करत नाही. पण असे खुप जण असतात ज्यांना वस्तू खरेदी करायची असतात पण त्यांच्याकडे डिस्काउंट मिळवून देणारे डेबिट/ क्रेडिट कार्ड नसतात त्यांना तुम्ही जर तुमच्या डेबिट/ क्रेडिट कार्ड चा वापर करुन वस्तू खरेदी करुन दिली तर त्यांना 10% डिस्काउंट भेटेल आणी तुम्हांला त्यातील थोडे कमिशन भेटेल.

पण असे ग्राहक तुम्हांला सापडणे किंवा त्यांना तुम्ही सापडणे शक्यच नाही (अपवाद तुमचे मित्र, नातेवाईक). यासाठीच एक मोबाईल अँप आहे, त्या मोबाईल अँप चे नाव येपर आहे. या अँप चा वापर ज्यांच्याकडे डेबिट/ क्रेडिटकार्ड आहेत ते चांगले पैसे कमविण्यासाठी आणि ज्यांना डिस्काउंट मध्ये वस्तू खरेदी करायची आहे असे लोक कमी किंमतीत वस्तू खरेदी करण्यासाठी करतात

येपर अँप सुरक्षित आणी कायदेशीर आहे का?

जेव्हा एखाद्या अँप ला आपण आपल्या डेबिट/ क्रेडिटकार्ड ची किंवा डेबिट कार्डची माहिती देतो आणी डेबिट/ क्रेडिटकार्ड चा वापर करुन इतरांना वस्तू खरेदी करुन देतो अशा वेळी ते अँप सुरक्षित आणी कायदेशीर आहे का नाही हे तपासणे खूप महत्वाचे आहे.

त्यासाठीच आम्ही सर्वप्रथम येपर अँपचे गूगल प्ले स्टोर वर रेटिंग बघितले. या अँप ला गूगल प्ले स्टोर वर 3.9 / 5 रेटिंग आहे. नवीन अँप ला 3.9 रेटिंग असणे खूप चांगले आहे. जेव्हा आम्ही गूगल प्ले स्टोर वर या अँप चे रेव्हिवू वाचले त्यामध्ये आम्हाला कोठेही स्पॅम किंवा पेड (पैसे देऊन दिलेले) रेव्हिवू वाटले नाहीत. तसेच जेव्हा आम्ही कमी रेटिंग असलेले रेव्हिवू वाचले तेथे कोठेही आम्हाला अँप सुरक्षितता वर संदेह घेणारे रेव्हिवू दिसले नाहीत, काही वापरकर्त्यांना अँपचा वेग, ऑटोमेशन, कमिशन याबद्दल प्रॉब्लेम होते त्यामुळे त्यांनी कमी रेटिंग दिलेल्या आहेत. अँप रेटिंग वरून आणी रेव्हिवू वाचल्यावर अँप सुरक्षित आणी कायदेशीर आहे असे वाटते. 

तरी सुद्धा तुम्ही अँप चा वापर करण्यापूर्वी अँप चे रेव्हियू आणि रेटिंग्स तपासावे

येपर अँप कसे काम करते?

एखाद्या वस्तूवर (शक्यतो मोबाईल) इकॉमर्स वेबसाईट मध्ये डेबिट/क्रेडिटकार्ड चा वापर करुन डिस्काउंट मिळत असल्यास येपर अँप ती वस्तू त्यांच्या होम पेज वर दाखवतात. ग्राहकाला कमी किमतीत मोबाईल खरेदी करायचा असल्यास ते येपर अँप च्या होम पेज वरून मोबाईल निवडतात, आणी त्याचे पैसे येपर ला पाठवतात ते पैसे येपर च्या नोडल खात्यामध्ये जमा होतात.

पैसे जमा झाल्यानंतर येपर ज्यांच्याकडे क्रेडिटकार्ड /डेबिट कार्ड आहे अशा लोकांना त्यांच्या येपर अँप च्या होम पेज वर मोबाईल दाखवतात आणी पेमेंट करण्याची विनंती करतात.

जेव्हा डेबिट/ क्रेडीट कार्ड धारक त्या मोबाईलचे पेमेंट करतात आणि पेमेंट केल्यानंतर काही कालावधीनंतर (१ दिवस ते जास्तीत जास्त १५ दिवस ) जेव्हा ग्राहकाला मोबाईलची डिलिव्हरी मिळते, तेव्हा येपर अँप नोडल खात्यामधून पैसे डेबिट/ क्रेडिट कार्ड धारकाच्या येपर खात्यामध्ये जमा करतात. त्यामधून डेबिट/ क्रेडिट कार्ड धारक त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये ते पैसे जमा करू शकतात.

येपर अँप वर खाते कसे तयार करावे ?

तुम्ही गुगल प्ले स्टोअर वरून येपर अँप सहजपणे डाउनलोड आणि इन्स्टॉल करू शकता .

गुगल प्ले स्टोअर सर्च बार मध्ये येपर सर्च करा किंवा येपर अँप डाउनलोड वर क्लिक करा. गुगल प्ले स्टोअर पेज येपर अँपविंडो सह ओपन होईल तेथून येपर अँप डाउनलोड आणि इन्स्टॉल करा.

अँप इन्स्टॉल केल्यानंतर ते ओपन करा आणि मोबाइल नंबर वापरून अँप मध्ये साइन इन करा. साइन इन च्या दरम्यान रेफरल कोड विचारल्यास हा रेफरल कोड – PRIT8484B9 वापरा.

साइन इन केल्यानंतर लेपर अँप मध्ये तुमचे खाते तयार होईल.

येपर अँप वर पैसे कसे कमवायचे ?

आपण उदाहरणासह येपर अँप चा वापर करून पैसे कसे कमवायचे ते पाहूया .

जेव्हा तुम्ही येपर अँप चे होम पेज ओपन कराल, होम पेज मध्ये डील्स मध्ये तुम्हांला वस्तू (उदाहरणार्थ  मोबाईल ) दिसतील.

खालील चित्रामध्ये तुम्हांला दोन मोबाईल दिसत असतील.जर तुम्ही ICICI बँकेचे डेबिट / क्रेडिटकार्ड वापरून जर दाखवलेल्या मोबाईलस चे पेमेंट फ्लिपकार्ट या वेबसाईट ला केले तर तुम्हांला पहिल्या आणी दुसऱ्या मोबाईल साठी अनुक्रमे 196 आणी 176 रुपये मिळतील. अधिक समजून घेण्यासाठी पहिल्या मोबाईल वर क्लिक करा.

आता तुम्हांला डील ची संपुर्ण माहिती दिसेल. डील ची माहिती नीट वाचा.

डील ची माहिती प्रत्येक वेळी वेगळी असते त्यामुळे पुढच्या पेज वर जाण्याआधी ती माहिती नीट वाचा. जर तुम्हांला काही प्रॉब्लेम असतील तुम्ही येपर अँप च्या कस्टमर केअर ला संपर्क करु शकता.

खाली दाखविलेल्या मोबाईल साठी 7199 रुपयांचे पेमेंट ICICI बँकेच्या डेबिट कार्ड चा वापर करुन फ्लिपकार्ट ला करावे लागेल. सर्व माहिती वाचून झाल्यावर नेक्स्ट वर क्लीक करा.

आता तुम्हांला फ्लिपकार्ट वेबसाईटवर जाण्याची विनंती करण्यात येईल.तुम्हांला तेथे दोन पर्याय दिसतील 1. मॅन्युअल आणी 2ऑटोमॅटिक.

मॅन्युअल मध्ये सर्व प्रोसेस तुम्हांला स्वतः करावी लागेल जसे तुमच्या इकॉमर्स वेबसाईट वर साइन इन, ग्राहकाचे नाव, पत्ता, फोन नंबर वगैरे स्वतः भरावे लागेल आणी डेबिट कार्ड चा वापर करुन पेमेंट करावे लागेल..

ऑटोमॅटिक मध्ये सर्व माहिती रोबोट द्वारे आपोआप भरली जाईल तुम्हांला फक्त तुमच्या इकॉमर्स वेबसाईट वर साइन इन करावे लागेल आणी डेबिट कार्ड चा वापर करुन पेमेंट करावे लागेल.

तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हांला तसा मेसेज आणी ई-मेल येईल. त्यानंतर जेव्हा मूळ ग्राहकाला मोबाईल भेटेल त्यानंतर तुमच्या अकाउंट मध्ये सर्व रक्कम जमा होईल.

या व्यतिरिक्त तुम्हांला क्रेडिट / डेबिट कार्ड वर तुम्ही केलेल्या खरेदीबद्दल पॉईंट्स ही जमा होतील, साधाहरणपणे 100/200 रुपयांच्या खरेदीवर तुम्हांला 1 रुपयाच्या मुल्याचा एवढे पॉईंट्स जमा होतील.

महत्वाच्या टिप्स :

  • तुम्ही किती पैसे कमवता हे तुमच्या क्रेडिट कार्ड मर्यादा किंवा डेबिट कार्डमधील रकमेवर अवलंबून असते.
  • तुम्ही महिन्याला 10000 रुपयांपर्यंत आरामशीरपणे कमवू शकता.
  • पण आमचा सल्ला आहे की तुम्ही महिन्याला 500 – 1000 रुपयांपर्यनच कमवायचा प्रयन्त करा. तुम्ही अति खरेदी करुन पैसे कमवले तर ते तुमच्या पॅनकार्ड वर दिसून येईल त्यामुळे तुम्हांला जास्त टॅक्स भरावा लागेल.

अजूनही तुमच्या काही शंका असतील तर कंमेंट्स मध्ये विचारा आम्ही नक्कीच लवकरात लवकर उत्तर द्यायचा प्रयत्न करू.

धन्यवाद!

हैप्पी अरनिंग!

Advertisement

Leave a Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s