खबरी अँप काय आहे? खबरी अँप चा वापर करुन पैसे कसे कमवावे?

खबरी एक भारतीय स्वयंप्रकाशित डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जेथे आपण स्वतःचे रेकॉर्ड केलेले ऑडिओ पोस्ट करु शकतो आणी पैसे कमवू शकतो. खबरी अँप वर चार महत्वाच्या श्रेणी (कॅटेगरिज) आहेत. ज्ञान, बातमी, सरकारी नोकरी आणी प्रेरणा या चार श्रेणिशी संबंधित विषयावर आपल्यावर ऑडिओ बनवावे लागतात.

सध्या खबरी अँप हिंदी आणी इंग्रजी या दोन भाषेमध्येच उपलब्ध आहे. पण लवकरच ते इतर भारतीय भाषांमध्येही उपलब्ध होईल.

पैसे कामविण्यासाठी तुम्हांला खबरी स्टुडिओ अँप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर त्या अँप मध्ये तुमचा नवीन चॅनेल तयार करावा लागेल आणी त्या चॅनेल वर तुम्हांला तुमच्या ऑडिओ किंवा पोडकास्ट पोस्ट करावे लागतील. जसेजसे तुमचे फॉलोवर्स वाढतील आणी लोक तुमचे ऑडिओ किंवा पोडकास्ट्स ऐकतील तेव्हा तुम्हांला पैसे मिळण्यास सुरुबात होईल. तसेच तुम्ही गिग पूर्ण करूनही पैसे कमवू शकता.

खबरी अँपवर खाते कसे तयार करावे?

तुम्हांला सर्वात प्रथम खबरी स्टुडिओ अँप गूगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करणे गरजेचे आहे.

खबरी स्टुडिओ अँप डाउनलोड वर क्लिक करा किंवा गूगल प्ले स्टोर च्या सर्चबार मध्ये खबरी स्टुडिओ (khabari studio ) सर्च करा. गूगल प्ले स्टोर पेज खबरी स्टुडिओ अँप विंडोसह ओपन होईल.

त्या पेज वरून खबरी स्टुडिओ अँप डाउनलोड करा आणी अँप इन्स्टॉल करा.

खबरी स्टुडिओ अँप इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा. अँप भाषा निवडा आणी फोन नंबर वापरून साइन अप करा.

साइन इन केल्यानंतर तुमचे खाते खबरी स्टुडिओ अँप वर तयार होईल आणी तुम्ही आता स्वतःचा चॅनेल तयार करुन ऑडिओ पोस्ट करुन पैसे कमवू शकता.

खबरी स्टुडिओ अँपवर चॅनेल कसा तयार करावा?

खबरी स्टुडिओ अँपवर साइन इन केल्यानंतर नवीन चॅनेल तयार करा (create a new channel) चे पेज ओपन होईल.

आता सर्वात प्रथम तुमच्या चॅनेल साठी श्रेणी (कॅटेगरी) निवडा.तुम्ही ज्ञान, बातमी, सरकारी नोकरी आणी प्रेरणा यामधील कोणतेही एक श्रेणी निवडा.

  • जर तुम्हांला कोणत्याही विषयाचे ज्ञान असेल तर तुम्ही ज्ञान श्रेणी निबंडू शकता. उदाहरणार्थ सायन्स आणी टेकनॉलॉजि, इंजिनीरिंग, भाषा, शेअर मार्केट, गणित, इत्यादी
  • जर बातम्या सांगणारे चॅनल बनवणार असाल तर बातमी श्रेणी निवडा.
  • जर तुम्ही सरकारी नोकरी संबंधित माहिती देणार असाल तर सरकारी नोकरी श्रेणी निबडा.
  • आणी जर तुम्ही प्रेरणादायी ऑडिओ चॅनल बनवणार असाल तर प्रेरणा श्रेणी निवडा.

श्रेणी निवडल्यानंतर तुमच्या चॅनेल ला एक उत्तम शीर्षक (टायटल) दया्.

टायटल दिल्यानंतर तुमच्या चॅनल बाबत थोडक्यात माहिती डिस्क्रिपशन मध्ये लिहा. तुमच्या चॅनल काय आहे आणी तुमचा चॅनल मुळे लोकांचा काय फायदा होईल याबाबत लिहा. ही सर्व माहिती जोडल्यानंतर चॅनेल तयार करा (create channel) वर क्लिक करा.

अभिनंदन! तुमचा नवीन चॅनेल आता तयार झाला आहे आणी तुम्ही त्यावर आता ऑडिओ पोस्ट करु शकता.

खबरी स्टुडिओ अँप वर ऑडिओ कशी पोस्ट करायची?

तुम्ही चॅनल तयार केल्यावर तुम्हांला मधोमध क्रियेट (create) बटण दिसेल, त्या बटणावर क्लिक करा.

अपलोड पेज ओपन होइल, त्यामध्ये रेकॉर्डिंग बटणावर क्लिक करा. सर्वप्रथम ते तुम्हांला रेकॉर्ड ऑडिओ करण्यासाठी परमिशन मागेल (म्हणजेच मोबाईल च्या माईक ची परमिशन ). तुम्ही ऑडिओ रेकॉर्ड करण्यासाठी परमिशन द्या.

आता रेकॉर्डिंग सुरु होईल, तुम्हांला ज्या विषयी बोलायचे किंवा ज्याची माहिती तुम्हांला लोकांना द्यायची आहे त्याबद्दल बोलण्यास सुरुवात करा. येथे फक्त तुमचा आवाज रेकॉर्ड होईल (विडिओ नाही). तसेच तुम्ही पॉज (pause) बटनाचा वापर करुन रेकॉर्डिंग थोड्याकाळासाठी थांबवू शकता आणी नंतर रेजूम (Resume) बटणाचा वापर करुन रेकॉर्डिंग पुन्हा चालू करू शकता.

पूर्ण रेकॉर्डिंग करून झाल्यावर डन बटणावर क्लिक करा. ते तुम्हांला केलेली रेकॉर्डिंग पोस्ट करायची परमिशन मागेल, यस वर क्लिक केल्यावर तुम्ही केलेली रेकॉर्डिंग खबरी अँप वर अपलोड होईल.

तसेच तुम्ही पूर्वी रेकॉर्ड केलेले ऑडिओ सुद्धा अपलोड करू शकता.

ऑडियो अपलोड केल्यानंतर आता तुमच्या ऑडिओ साठी एक चांगले टायटल द्या . तसेच ऑडियो बद्दल थोडी माहिती डिस्क्रिपशन मध्ये लिहा आणी श्रेणी निवडा. श्रेणी जोडल्यानंतर नेक्स्ट बटणावर क्लिक करा.

आता तुमच्या ऑडियो साठी एक इमेज किंवा थम्बनेल जोडा. तसेच तुमच्या ऑडियोशी संबंधित टॅग्स जोडा. टॅग्स जोडल्यानंतर पब्लिश बटणावर क्लिक करा तुमची ऑडियो आता पब्लिश होईल

महत्वाची टीप : रेकॉर्डिंग कमीत कमी 45 सेकंडाचे असावे.

आता तुम्ही तुमची पहिली ऑडिओ पोस्ट खबरी स्टुडिओ अँप वर अपलोड केलेली आहे आणी ती इतरांना खबरी अँप वर दिसेल.

खबरी अँप वर पैसे कसे कमवायचे?

खबरी अँप वर तुम्ही तुमच्या ऑडिओ पोस्ट करुन पैसे कमवू शकता.

जसे जसे तुमचे फॉलोवर्स वाढतील तसे तुम्हांला पैसे मिळण्यास सुरुवात होईल.

तसेच तुम्ही पोस्ट केलेल्या ऑडिओ कीती जणांनी ऐकल्या यावरही तुम्ही कीती पैसे कमवणार हे अवलंबून असते.

ऑडिओ पोस्ट नियमितपणे अपलोड करा. तुम्ही जेवढे नियमितपणे पोस्ट अपलोड कराल तेवढे तुमचे फॉलोवर वाढतील.

खबरी अँपवर तुम्ही गिग पूर्ण करूनही पैसे कमवू शकता.

आम्ही शक्य तितक्या लवकर अधिक तपशील अपडेट करू.

धन्यवाद !

Advertisement

Leave a Comment

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s